
Flood Situation Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पूरस्थिती निर्माण होऊ लागली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली. जिल्ह्यातील अनेक मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, पावसाचा जोर आज (ता.१७) देखील राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाने उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, १८ आणि १९ ला ‘येलो अलर्ट’ दिला आहे.