माणगाव खोऱ्यात `या` पुलावर पाणी आल्याने 27 गावे संपर्कहीन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

माणगाव खोऱ्यातील सुमारे सत्तावीस गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकजण अडकुन पडले होते.

माणगाव ( सिंधुदुर्ग ) - खोऱ्यात गेले दोन - तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक पुलावर पुराचे पाणी आले होते. मंगळवारी (ता. 4) सायंकाळी आंबेरी पुल पाण्याखाली गेला.

त्यामुळे माणगाव खोऱ्यातील सुमारे सत्तावीस गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकजण अडकुन पडले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पुला लगतच रस्ता खचला आहे. त्यावरील डांबरमिश्रीत खडीचे थर उखडले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Water On Amberi Bridge 27 Villagers Communication Lost