कणकवली शहरासह महामार्गावर पाणीच पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

कणकवली - चौपदरीकरणात शहरातून पश्‍चिमेच्या दिशेने जाणारे नाल्याचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने शहरातील काही भागात पाणी साचले होते. महामार्गाचीही तीच अवस्था होती. पर्यायी रस्ता व मोरीचे बांधकाम खचल्याने पहाटेपासून वाहतूक अधूनमधून ठप्प होत होती. 

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत अनेक आंदोलने झाली. प्रसारमाध्यमांनी सातत्याने या कामावरील सदोष गोष्टी जनतेसमोर मांडल्या. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर यांना उशिराने जाग आली. शनिवारी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून सूचना दिल्या. मात्र, वरूणराजाने आक्रमक रूप धारण केले आणि महामार्गाची दुरावस्था झाली. शहरातील बहुतांशी नाले तुडुंब भरून गेले होते व महामार्ग ठिकठिकाणी खचला होता. 

आचरा रस्त्यावर वाहतूक ठप्प 
कणकवली ते आचरा हा मार्ग वरवडे फणसवाडी येथे पाणी रस्त्यावर आल्याने ठप्प झाला होता. सकाळी साडेदहा ते साडेबारापर्यंत रस्त्यावर पाणी होते. पावसाचा जोर मंदावल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood water on road in Kankavali