सावंतवाडी पाठोपाठ बांदा शहरातही कोरोनाचा शिरकाव : त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Following Sawantwadi corona infiltrated Banda city one more corona patient found in kokan

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पाठोपाठ बांदा शहरातही कोरोनाचा शिरकाव

सावंतवाडी पाठोपाठ बांदा शहरातही कोरोनाचा शिरकाव : त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह...

बांदा(सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पाठोपाठ बांदा शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील निमजगावाडी येथील २७ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर युवकाला ताप व सर्दी असल्याने बुधवारी सकाळी त्याला तपासणीसाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.

सदर स्वॅबचा अहवाल गुरुवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाला असून अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोना बाधित युवक स्थानिक असून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे सुरु झाले आहे. तसेच बांदा - निमजगा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यासंदर्भात सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचा- बाळंतीण कोरोना बाधित, वडिल संशयित मग नवजात शिशूसाठी कोण आले धावून....वाचा -


 बांदा शहरात महिनाभरापूर्वी मुंबईहून आलेली संस्थात्मक क्वारंटाइन असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळाली होती. मात्र आता स्थानिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा- नाणार प्रकल्प सुरू करा, कोकणवासियांच्या पोटावर पाय मारू नका,  असे आवाहन कुणी केले शिवसेनेला -


दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. आज सकाळी ७ वाजताच सरपंच अक्रम खान यांनी या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यास प्रारंभ केला. स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन यावेळी सरपंच खान यांनी केले आहे. यावेळी सरपंच खान, संजू विरनोडकर टीमचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.


संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top