जयंत पाटील तुमच काय काय गंजलेल आहे बोलायला लावू नका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या नेत्यांना विरोधात बसावे लागले हे अद्यापही पचनी पडलेले नाही.

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीचे इस्लामपूर मतदारसंघ मर्यादित नेते जयंत पाटीलाना स्वतःला सगळं समजतं असा गैरसमज आहे. गंजलेल्या तोफा दुरुस्त होतात पण गंजलेले विचार दुरुस्त होत नाही. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार. तुमचं काय काय गंजलेल आहे बोलायला लावू नका. असा टोला माजी आमदार निलेश राणे यांनी लगावला आहे.

 

मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या नेत्यांना विरोधात बसावे लागले हे अद्यापही पचनी पडलेले नाही. त्यामुळे प्रलोभने दाखवून व्याभिचार करीत सत्तेत येण्याचा या ना त्या मार्गाने भाजपचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्ष अडचणीत असल्याने महाविकास आघाडीविरुद्ध वेगवगेळा अपप्रचार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- महाविकास आघाडीसमोरील आव्हाने ;  महापालिका निवडणूक एकत्रित की स्वबळावर

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे मातोश्रीच्या पिंजऱ्यातील वाघ अशी टीका भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. याचा समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी घेतला. गंजलेल्या तोफीतून निघणाऱ्या गोळ्यांचा आम्ही फारसा विचार करीत नसल्याचा टोला पाटील यांनी राणेंना लगावला.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Nilesh Rane criticize on jayant patil