दोडामार्ग : ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळात हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना पंचवीस लाखांची मदत जाहीर केली होती. गवस कुटुंबीयांना वनविभागाने दहा लाखांची मदत दिली आहे. एकच हत्ती पकडण्यासंदर्भात आदेश काढून शासन शेतकऱ्यांची (Farmers) थट्टा करत आहे. आम्ही मृताच्या वारसांना उर्वरित पंधरा लाख रुपये लवकर मिळवून देत सर्वच हत्तींना पकडण्याची मागणी करणार आहोत व विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्याविषयी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी स्पष्ट केले.