राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची 'येथे' होणार हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four NCP Corporators Will Be Expelled Ratnagiri Marathi News

विधानसभा निवडणुकीदरम्यान तर काही नगरसेवकांनी सेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मदत केल्याचा त्यांच्याव ठपका आहे. काही नगरसेवक उघडउघड सेनेबरोबर फिरत होते. याचा सविस्तर अहवाल तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला होता.

राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची 'येथे' होणार हकालपट्टी

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी याला दुजोरा दिला. एवढ्या टोकाची भूमिका आम्ही घेणार नव्हतो. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात चौंघांविरुद्ध तीव्र संताप आणि चीड असल्याने पक्षातुन काढण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात ही कारवाई केली जाईल, असे मयेकर यांनी सांगितले. 

येथील पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक आहेत. त्यापैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा सोहेल साखरकर यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवला आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते.

हेही वाचा - लयभारी ! श्री मार्लेश्वरवारी करणारा असाही दिव्यांग भक्त 

विधानसभा निवडणुकीदरम्यान तर काही नगरसेवकांनी सेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मदत केल्याचा त्यांच्याव ठपका आहे. काही नगरसेवक उघडउघड सेनेबरोबर फिरत होते. याचा सविस्तर अहवाल तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला होता. आता थेट नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा या चौघांनी पक्षाविरोधात काम केले आहे. विधानसभा व नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादीच्या या चार नगरसेवकांना पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही वाचा - निष्ठावंत असल्यानेच चिपळूण काँग्रेस शहराध्यक्षपदी यांना संधी 

तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी अशांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे चौघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी स्पष्ट केले आहे. या नोटीसीला 15 दिवसात संबंधितांनी उत्तर द्यावयाचे आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर म्हणाले, पक्षविरोधी काम केल्याबद्दल चार नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र आता उत्तराची वाट बघण्याची गरज नाही. तालुकाध्यक्ष म्हणून मला अधिकार आहेत. त्यानुसार दोन दिवसात चारही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल.