लयभारी ! श्री मार्लेश्वरवारी करणारा असाही दिव्यांग भक्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

या वर्षीच्या साजऱ्या होणाऱ्या मार्लेश्‍वर यात्रेसाठी ते देवरूखमध्ये हजर झाले आहेत. जुन्नर येथील अलदरे गावातील खंडू सरजिनेना लहान वयात अर्धांगवायूचा झटका आला.

देवरूख ( रत्नागिरी ) - शालेय जीवनातच आलेला अर्धांगवायूचा झटका. त्यात निकामी झालेली उजवी बाजू. अशा अवस्थेत वयाच्या 52 व्या वर्षीही ते केवळ परमेश्‍वराच्या साधनेसाठी पायपीट करतात. शिवभक्‍त असलेल्या जुन्नर (पुणे) येथील खंडू सरजिने यांची ही कथा असून यंदा सलग 15 व्या वर्षी त्यांनी जुन्नर ते देवरूख हा पायी प्रवास यशस्वी करून दाखवला आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीतील शेतजमिनीत या घटकांचे घटले प्रमाण

या वर्षीच्या साजऱ्या होणाऱ्या मार्लेश्‍वर यात्रेसाठी ते देवरूखमध्ये हजर झाले आहेत. जुन्नर येथील अलदरे गावातील खंडू सरजिनेना लहान वयात अर्धांगवायूचा झटका आला. यावर उपचार झाले तरीही त्याची उजवी बाजू म्हणावी तशी काम करीत नाही. याही अवस्थेत त्याने आपली ईश्‍वरभक्‍ती जराही कमी केली नाही. तोंडातून केवळ हरी ओम हे शब्द बाहेर पडत असताना आणि चालताना उजवा पाय फरफटत नेत असताना खंडूने आजवर सलग 15 वर्षे जुन्नर ते मार्लेश्‍वर हा शेकडो कि. मी. चा प्रवास पायी यशस्वी केला आहे. 26 नोव्हेंबर 2019 ला जुन्नरहून निघाले आणि देवरुखात पोचले. 14 ते 20 असा मार्लेश्‍वर दौरा करून ते पुन्हा जुन्नरला रवाना होणार आहेत. आपल्या पायी प्रवासाबद्दल सांगताना खंडू यांनी नोव्हेंबर ते जानेवारी अशा आपल्या पायी प्रवासात दररोज रात्री वाटेत येणारी मंदिरे, धार्मिक स्थळे, धर्मशाळा या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगितले. 

हेही वाचा - मुलीकडचे म्हणून कोंडगावकरांकडे दुर्लक्ष नको 

दर सोमवारी कडक उपवास 

दर सोमवारचा आपला कडक उपवास असून या दिवशी काहीही न खाता प्रवास करायचा. एरवी आपण माधुकरी मागून पोट भरत असल्याचे ते सांगतात. सकाळी कितीही थंडी असली तरी थंड पाण्याने अंघोळ व सकाळी व सांयकाळी ज्या ठिकाणी वस्ती असेल, त्या ठिकाणी शिवाचे नाम संकीर्तन, पठण व जप असे उपक्रम ते करतात.  

हेही वाचा - श्री देव मार्लेश्‍वराच्या विवाहसोहळ्याचे वेध 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicap Khandu Sarjine Marleshwar Yatra From 15 Years Ratnagiri Marathi News