खेडमध्ये ढोकळ्यातून चार जणांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

एक नजर 

  • खेड येथील एका मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्याने चार मुलांना विषबाधा
  • ही चारही मुले सुसेरी येथील
  • विषबाधा झालेल्या मुलांची नावे अशी - विदिशा खेराडे (वय.७), आरव खेराडे (वय ४), निधि खेराडे (वय ४), अनीशा पवार (वय ३) 

खेड - येथील एका मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्याने चार मुलांना विषबाधा झाली आहे. त्यांना डेरवण येथील वालावलकर हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही चारही मुले सुसेरी येथील आहेत. विषबाधा झालेल्या मुलांची नावे अशी - विदिशा खेराडे (वय.७), आरव खेराडे (वय ४), निधि खेराडे (वय ४), अनीशा पवार (वय ३).

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील बाजारपेठेतील एका मिठाईच्या दुकानातून शनिवारी सायंकाळी एका भाजी विकणाऱ्या महिलेने ढोकळा विकत घेतला. तिने सुसेरी येथील घरी जाऊन आपल्या नातवंडाना तो ढोकळा खायला दिला. खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने मुले उलट्या करू लागली. त्यांना तातडीने कळबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये रात्री उशीरा दाखल केले. या विषबाधेमुळे सुसेरी येथील संतप्त ग्रामस्थांनी मिठाईचे दुकान बंद पाडले. खाद्य पदार्थातून विषबाधा झालेल्या चार मुलांना डेरवण हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आता त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four people were poisoned after eating a Dhokala

टॅग्स