कणकवली : नोकरीचे आमीषाने दीड लाखाला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

कणकवली तालुक्‍यातील शिवडाव चिंचाळवाडी येथील एका तरूणाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी देतो असे सांगून सुमारे दीड लाख रूपयाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संशयितावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (रा. तोंडवली) असे त्या संशयिताचे नाव असून सध्या तो कुडाळ येथील एका फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे. 

कणकवली - तालुक्‍यातील शिवडाव चिंचाळवाडी येथील एका तरूणाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी देतो असे सांगून सुमारे दीड लाख रूपयाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संशयितावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (रा. तोंडवली) असे त्या संशयिताचे नाव असून सध्या तो कुडाळ येथील एका फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे. 

याबाबत फिर्यादी विशाल श्रीधर शिरसाट (वय 29, रा. शिवडाव) यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार संशयित श्रीकृष्ण कुडतरकर यांनी आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो, असे सांगितले होते. यासाठी 2 मेस 60 हजार रूपयेची मागणी केली. त्यावेळी बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंक खात्यात 60 हजार रूपये तर 4 मेस 69 हजार रूपये जमा केले. त्यानंतर 25 मेस पुन्हा कॉल लेटरसाठी संशयिताने 14 हजार रूपयेची मागणी केली. ही रक्कम कणकवलीत एका खाजगी बसच्या चालकाकरवी संशयित आरोपीला पोच करण्यात आली.

त्यानंतर फिर्यादी विशाल हा आपल्याला कॉल लेटर न आल्याने संशयित श्रीकृष्ण कुडतरकर यांच्या तोंडवली येथील घरी गेला. तेथे त्यांच्या पत्नीची भेट घेवून चौकशी केली असता तिने फोनवरून संशयिताचे बोलणे करू दिले. त्यानंतर त्याच दिवशी संशयिताने 44 हजार रूपये फिर्यादीच्या खात्यावर जमा केले आणि 4 ते 5 दिवसात उर्वरीत रक्कम देतो असे सांगितले होते. त्यानंतरच्या कालावधीत संशयिताचा मोबाईल बंद होता त्यामुळे संपर्क झाला नाही.

जुलैमध्ये कुडाळ पोलिसात फिर्यादी राजाध्यक्ष यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ही बातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर संशयिताने आपलीही फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर आज विशाल शिरसाट यांनी येथील पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात 420 चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कुडाळ पोलिसांकडील तपास आणि कोठडी संपल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in giving job opportunity Crime News in Kankavli Taluka