

Social Welfare: Free Admissions Open for Raigad Govt Hostels for AY 2026-27
पाली : सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सात शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरीब, हुशार, होतकरू तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार हे प्रवेश दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे.