रत्नागिरी नगर वाचनालयात मोफत ऑडिओ बुक्‍स सेवा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

या ऍपच्या सेवेचा प्रारंभ ऍड. पटवर्धन यांनी केला. त्या वेळी वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर, कार्यवाह मालती खवळे, व्यवस्थापक समिती सदस्य सीए चिंतामणी काळे उपस्थित होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने नवनवीन उपक्रम वाचक, सभासदांसाठी आयोजित करत असते. 

रत्नागिरी - नगर वाचनालय आणि स्टोरी टेल यांच्यावतीने सभासदांना मोफत ऑडिओ बुक्‍स सेवा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले वाचनालय ठरले आहे. यामुळे वाचकानी समाधान व्यक्त केले. सुरवातीला 500 जणांना स्टोरी टेलच्या माध्यमातून ऑडिओ बुक्‍सची सेवा मिळणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. 

या ऍपच्या सेवेचा प्रारंभ ऍड. पटवर्धन यांनी केला. त्या वेळी वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर, कार्यवाह मालती खवळे, व्यवस्थापक समिती सदस्य सीए चिंतामणी काळे उपस्थित होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने नवनवीन उपक्रम वाचक, सभासदांसाठी आयोजित करत असते. 

डिजिटल युगाचा होणारा प्रसार लक्षात घेता, ऑडिओ डिजिटल सुविधेच्या माध्यमातून वाचक सभासदांसाठी स्टोरी टेल ऍपबरोबर करार केला. वाचनालय एक महिना हे ऍप वाचक सभासदांसाठी मोफत पुरवत आहे. स्टोरी टेल ऍपने वाचकांसाठी सवलतीच्या दरामध्ये वाचनालयाबरोबर करार केला असून एक महिना दिलेली ही सुविधा प्रतिसाद पाहता वाढवण्याची मनिषा व्यक्त केली आहे. स्टोरी टेलचे मराठी विभागाचे प्रमुख प्रदीप मिरासदर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या माध्यमातून डिजिटल ऑडिओ ऍपचे दालन वाचकांसाठी खुले करून देताना आनंद होत आहे, असे वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन म्हणाले. स्टोरी टेल या ऍपमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनेक नामांकित पुस्तकांचे प्रसिद्ध व्यक्तींनी अभिवाचन केले आहे. 

वाचनालयात साधा संपर्क 
ही सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी वाचक, सभासदांनी नगर वाचनालयाकडे सकाळी 9 ते 11.30 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संपर्क साधावा. ऍप मोफत उपलब्ध करून घेऊन त्याचा आस्वाद घ्यावा. या सुविधेचा लाभ अधिकाधिक वाचक सभासदांनी घ्यावा, असे आवाहन ऍड. पटवर्धन यांनी केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Audio Book Service At Ratnagiri Nagar Library