

Resource Panic: Fuel Stations in Raigad Overwhelmed by Panic Buying Amid Global War Fears
Sakal
पाली : इराण आणि इस्त्रायल युद्धजन्य परिस्थिती व आंतरराष्ट्रीय तणावामुळे खनिज तेलाच्या किमती भडकल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, दरवाढीनंतरही शहरी व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. भविष्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, या भीतीने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये 'पॅनिक बायिंग' (भीतीपोटी खरेदी) सुरू झाली असून, बहुतांश वाहनधारक आपल्या वाहनांच्या टाक्या 'फुल्ल' करण्याला प्राधान्य देत आहेत.