कोकणात एकजुटीतून गावांचा विकास : सिद्ध केले मंडळ ' गावासाठी'....

Funds are deposited in the Board through monthly subscription activities kokan marathi news
Funds are deposited in the Board through monthly subscription activities kokan marathi news

मंडणगड (रत्नागिरी) : कोकणात एकजुटीतून गावांचा विकास साधण्यासाठी गाव तेथे मंडळ हे समीकरण ठरलेले. गावाच्या नावावरून अशा मंडळाना ओळखले जाते. मासिक वर्गणी, कामांची गावकी व विविध उपक्रमांतून मंडळात आर्थिक निधी जमा केला जातो. पण ज्यावेळी गावांतील नागरिकांवर कठीण परिस्थिती येते त्यावेळी अशी मंडळे गावासाठी धावून जाताना अभावानेच आढळतात.

मात्र मंडणगड तालुक्यातील भट्टीवाडी येथील ग्रामस्थ व मुंबई मंडळाने लॉक डाऊनच्या कालावधीत आवश्यकता ओळखून आर्थिक सहाय्य म्हणून गावात घरपट एक हजार रक्कम वाटप करीत भट्टीवाडी मंडळ हे ' गावासाठी ' असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या या अनोख्या आणि गावहिताच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. कोकणात असा उपक्रम राबविणारे भट्टीवाडी मंडळ हे पहिलेच ठरले आहे.

या मंडळाने वाटला घरपट आर्थिक निधी
 ग्राम संस्कृतीत आपण आपल्या वाडीचे, गावाचे, समाजाचे काही तरी देणे लागतो अशी भावना असते. याच संकल्पनेतून मौजे भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या आर्थिक सहाय्यातुन हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवत असलेल्या कोरोना विषाणू या रोगात संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू आहे. रोजगार उपलब्ध होत नाही. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात मूलभूत गरजांची पूर्तता पूर्णपणे होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे.

सिद्ध केले मंडळ ' गावासाठी '

आजच्या या जागतिक संकटात सापडलेल्या आपल्या गावबांधवांना मग ते मुंबईस्थित असोत किंवा ग्रामिण ठिकाणी वास्तव्यास असोत अशा सर्वांना मौजे भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी आपल्या मंडळाच्या मार्फत यथाशक्ति प्रमाणे आर्थिक स्वरूपात घरपट रोख रुपये १ हजार अशाप्रमाणे एकूण ४१ हजार रुपयांचे वाटप केले.

याप्रसंगी मंडळाचे मुंबई अध्यक्ष रामचंद्र तांदळे, मुंबई सचिव सुरेश पोस्टुरे, संतोष मालप, सचिन शिगवण, रणजित पातेरे, दिलीप मालप, गणेश पोस्टुरे तसेच ग्रामीण अध्यक्ष पांडुरंग शिगवण, ग्रामीण सचिव विलास शिगवण, सल्लागार गंगाराम शिगवण आदी उपस्थित होते. गावातील वातावरण ही पूर्णपणे शांत आहे. सध्या पावसाळ्या पूर्वीच्या कामांना वेग आला आहे. सरकारच्या नियमाचे अगदी तंतोतंत पालन होत असून तशी खबरदारी घेतली जात आहे.


प्रत्येक वेळेस व्यक्तीकडून लोकवर्गणी न काढता अशा परिस्थितीत कधीतरी लोकांना मंडळाकडून आर्थिक स्वरूपात म्हणा किंवा अन्य स्वरूपात म्हणा मोबदला देण्यात यावा, जेणेकरून मग आपल्या लोकांचा आपल्या ग्रामस्थ मंडळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.
- गणेश पोस्टुरे, भट्टीवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com