हुतात्मा जवान प्रथमेशवर 'अमर रहे'च्या जयघोषात अंत्यसंस्कार

सुनील पाटकर
गुरुवार, 17 मे 2018

महाड : भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर 'प्रथमेश कदम, अमर रहे'च्या जयघोषात आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव कार्यादरम्यान उच्चदाब वीज वाहिनीचा स्फोट होऊन त्यात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना 15 मेला मृत्यू झाला. 

गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास प्रथमेश याचे पार्थिव शेवते यागावी एका खाजगी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. शेवते याठिकाणी प्रथमेश कदम याचे पार्थिव येताच त्याच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला.

शेवते येथील स्मशानभूमीत भारतीय लष्कराच्या भोपाळ येथील एमईएम युनिटचे सुभेदार मेजर आर.बी.तांबे, हवालदार एस.ए.काशिद , हवालदार अमोल जाधव , मुंबई युनिटचे मेजर नरेश कुमार यांनी प्रथमेशच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. रायगड पोलिस दलानेही प्रथमेशच्या पार्थिवाला सलामी दिली. शोकाकुल वातावरणातच चुलत भाऊ चिराग याने प्रथमेशला अग्नी दिला. 

शासनातर्फे तहसीलदार चंद्रसेन पवार, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटील, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, काँग्रेसचे युवा नेते हनुमंत जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत दळवी,चंद्रकांत  जाधव आदींनी त्याला श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी महाड तालुका आमदार भरत गोगावले यांनी तालुक्याबरोबर देशाची हानी झाल्याचे सांगून सातत्याने सीमेवर तरुणांचे हुतात्मा होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून या तरुण जवानाला महाड विधानसभा मतदार संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर माजी आमदार माणिक जगताप यांनीही कदम कुटुंबाला सैन्यदलाची परंपरा आहे. रायगडच्या ऐतिहासिक भूमीला साजेसे असे कार्य शहीद प्रथमेशने केल्याचे सांगितले. भारतमातेच्या या सुपुत्राच्या अंत्ययात्रेला हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral in the joule of Martyr Jawan Prarthamesh