Ganeshutsav 2022 : जीएसटी रद्दची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshutsav 2022 Ganeshotsav Mandal Demand for GST Abolition inflation chiplun

Ganeshutsav 2022 : जीएसटी रद्दची मागणी

चिपळूण : यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे. मात्र वाढती महागाई आणि बहुतांश वस्तूंवर लागू झालेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांचा भार कसा सोसायचा असा प्रश्न बहुतांश मंडळांना पडला आहे. त्यामुळे जीएसटी रद्द करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे. सजावट, विद्युत रोषणाई, मंडप, फलके आदी सेवांवर १२ ते १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. ज्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. सजावट, मंडपाविना सार्वजनिक उत्सव साजरा करता येणार नाही.

कोरोनामुळे चिपळुणातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यात जीएसटीमुळे आणखी पिळवणूक होत आहे. गणेशोत्सवावर जीएसटीच्या रुपाने आलेले विघ्न दूर करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य नित्यानंद भागवत यांनी केली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द केल्यास सार्वजनिक मंडळांवरील आर्थिक भार कमी होईल. बचतीची रक्कम मंडळांना उत्सवकाळात लोकोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जीएसटी नोंदणीचे बंधन नाही. मग त्यांनी जीएसटीचा भूर्दंड का सहन करावा, असा प्रश्नही सार्वजनिक मंडळाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

श्री सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हा खर्च आम्ही कुणाकडूनही बलजबरीने वसूल करत नाही. भक्तांनी सहखुशीने दिलेल्या देणगीतून हा खर्च भागवला जातो. त्यामुळे जीएसटीची रक्कम भरणे शक्य नाही. शासनाने यामध्ये आम्हाला सूट द्यावी.

-नित्यानंद भागवत, सदस्य, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण

सणांवर अशाप्रकारे जीएसटी लावली गेली तर यापुढे असे उत्सव साजरे करताना मर्यादा येणार आहेत. दोन वर्षांनंतर मुक्त वातावरणात सण साजरे करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे शासनाकडून सवलत मिळाली पाहिजे. तसे न करता हा लुटण्याचा प्रकार सुरू आहे.

- महेंद्र कदम, चिपळूण

Web Title: Ganeshutsav 2022 Ganeshotsav Mandal Demand For Gst Abolition Inflation Chiplun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..