खवले मांजर तस्करी करणारी टोळी सिंधुदुर्गात ताब्यात

तुषार सावंत
सोमवार, 8 एप्रिल 2019

एक नजर 

  • कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक. 
  • एलसीबी आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाची कारवाई
  • विक्रीसाठी आणलेले पाच किलो वजनाचे खवले मांजर जप्त
  • आंतरराष्ट्रीय बाजारात खवल्या मांजराची किंमत सुमारे 40 लाख
  • वन्यजीव शेड्युल वन मधील अतिदुर्मिळ प्रजातीमध्ये खवल्या मांजराची गणना  

कणकवली - कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला एलसीबी आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेले पाच किलो वजनाचे खवले मांजर जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात खवल्या मांजराची किंमत सुमारे 40 लाख आहे. वन्यजीव शेड्युल वन मधील अतिदुर्मिळ प्रजाती मध्ये खवल्या मांजराची गणना आहे  

याप्रकरणी चार संशयित आरोपींसह मोटार पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.  गणपत सत्यवान घाडीगांवकर, सचिन पांडुरंग घाडीगांवकर (दोघे रा. दिवा मुंबई ), नवरुद्दीन कादिर शिरगावकर ( रा.मणचे , देवगड ), प्रकाश शांताराम गुरव (गुरववाडी ,रा.साळीस्ते ) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. प्रकाश गुरव यानेच घाडीगांवकर याला हे खवलेमांजर विकल्याचा संशय आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang of Pangolin smuggler arrested in Kankavali