
पाली : सुधागड तालुका मराठा समाजाचे सरचिटणीस सुजित बारसकर मागील पाच वर्षापासून सातत्याने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत. या वर्षीही मंगळवारी (ता.2) त्यांनी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणरायाचे विसर्जन आपल्या पालीतील घराच्या टेरेसवर कृत्रिम पाण्याच्या टाकीमध्ये केले. त्यांच्या या पर्यावरण पूरक व विधायक गणेशोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.