why is Ganpatipule beach closed again
esakal
रत्नागिरी : समुद्रातील धोकादायक स्थिती कायम असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा गुरुवारपासून (ता. ३) जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या आदेशानंतर पुन्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला (Ganpatipule beach latest news today) आहे. दहा दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार, हा किनारा खुला करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचा निर्णय रद्द करून ही बंदी लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांसह पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.