esakal | गणपतीपुळे बनलय एक दिवसाचे पर्यटन स्थळ 
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpatipule Become One Day Tourist Spot

मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. गेले सहा महिने कोरोनाची भिती कायम होती. सप्टेंबर महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात शिथिलता येऊ लागली.

गणपतीपुळे बनलय एक दिवसाचे पर्यटन स्थळ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनामुळे घरातच राहून कंटाळलेले लोकं हळूहळू पर्यटनासाठी किनारी भागांकडे वळू लागला आहे. टाळेबंदीतील शिथिलतेनंतर गणपतीपुळेत पश्‍चिम महाराष्ट्रासह रत्नागिरीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक एक दिवसाच्या पर्यटनासाठी दाखल होत आहे. दररोज दोनशेहून अधिक पर्यटक येत आहेत. त्याचा फायदा किनाऱ्यावरील फेरीवाल्यांना होत असून लॉजिंगवाले अजुनही व्यवसायाच्या प्रतिक्षेत आहेत. 

मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. गेले सहा महिने कोरोनाची भिती कायम होती. सप्टेंबर महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात शिथिलता येऊ लागली.

कोरोनामुळे घरातच राहीलेल्या मुंबई, पुण्यासारख्या शहरामधील लोके आता पर्यटनासाठी बाहेर पडण्यास इच्छुक आहेत. काहींनी बाहेर पडण्यास सुरवातही केली आहे. त्याचा फायदा कोकणातील किनारी भागांना होत आहे.

सध्या कोकणात थंडी पडू लागल्यामुळे वातावरणही पोषक आहे. भविष्यात पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी दहा लाखाहून अधिक पर्यटक येत असलेल्या गणपतीपुळेतील पर्यटन व्यावसायिक पर्यटकांची चातकासारखी वाट पाहत आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्हाबंदी शिथिल केल्यानंतर त्यात वाढ झाली.

गणपतीपुळेत दिवसाला दोनशेहून अधिक पर्यटक दाखल होत आहेत. बहुतांश पर्यटक हे पश्‍चिम महाराष्ट्रातीलच आहेत. एक दिवसाच्या पर्यटनाचा आनंद घेऊन ते माघारी परतात. त्याचा फायदा लॉजिंगवाल्यांना होत नाही. हॉटेल आणि अन्य फेरीवाल्यांकडे त्यांचा कल असतो.

पर्यटक येऊ लागल्यामुळे गणपतीपुळे किनाऱ्यावरील उंड, घोडे यासह विविध खेळणी घेऊन बसणारे फेरीवाले, फोटोग्राफर दिसत आहेत. गणपतीपुळे देवस्थान परिसरातील दुकाने सुरु करण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. कोरोनाशी निगडीत उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांना दिल्या गेल्या आहेत; परंतु मंदिरे सुरू होत नाहीत, तोपर्यंत पर्यटन व्यावसायाला चालना मिळणार नाही असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

किनारी भागात पर्यटक येत आहेत. त्यामध्ये राहणाऱ्यांचा टक्‍का नगण्य आहे. त्यामुळे लॉजिंग व्यावसायिकांना मंदिर सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. 
- भालचंद्र नलावडे, व्यावसायिक