सुटी पडली की, अनेकजणं श्रींच्या दर्शनाबरोबरच किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी धाव घेतात.
रत्नागिरी : तालुक्यातील (Ratnagiri) जागतिक दर्जाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे विकेंडला पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. शनिवार, रविवार जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, पुण्याच्या पर्यटकांनी गणपतीपुळेला (Ganpatipule) प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींचीही जोड मिळालेली आहे. दोन दिवसांत सुमारे २५ हजार भक्तांनी गणपतीपुळे मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.