झाराप-पत्रादेवी महामार्गावर वाहनांच्या धडकेत गव्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 May 2019

सावंतवाडी - झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गव्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात गव्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.  

सावंतवाडी - झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गव्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात गव्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.  

मोठ्या वाहनांची धडक गव्याला लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे सहाययक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, येथील वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे वनरक्षक श्री कटके, श्री राणे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने गव्याचा मृतदेह ताब्यात घेतला व त्याच्यावर परिसरात बाजूला अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगर परिसरातील शौचालयाच्या टाकीत गवा पडल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. नरेंद्र डोंगर परिसरात गव्यांचे कळप एकत्र फिरताना दिसत आहेत. गव्यामुळे अनेक ठिकाणी भीती निर्माण झाली आहे. नरेंद्र डोंगर येथील शौचालयाच्या टाकीत एक गवा पडला होता. त्याला बाहेर काढण्यास यश आले होते. त्यानंतर आजची घटना घडल्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून वनविभागाकडे होत आहे. अलीकडे गव्यांच्या खाजगी क्षेत्रात येण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gava Dead in an accident on Zharap Patradevi Road