esakal | प्रशासनाची चिंता वाढली : लोटेतील या कंपनीतही कोरोनाचा शिरकाव..
sakal

बोलून बातमी शोधा

Gharda Company in Lotte Industrial Estate and Coronavirus infected in chiplun

दोन्ही कोरोनाबाधितांच्या कुटूंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याच्या हालचाली सुरू होत्या.

प्रशासनाची चिंता वाढली : लोटेतील या कंपनीतही कोरोनाचा शिरकाव..

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) :  तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनी व त्यांच्या वसाहतीत कोरोनाचा विळखा घटत झालेला असतानाच विनती कंपनीतही कोरोनाचा  शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री प्राप्त अहवालानुसार दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील एकजण विनती कंपनीतील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -कोकणात गणेशोत्सवासाठी  आयसी एमआरच्या गाईडलाईन नुसार नियम  : उदय सामंत -


खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या 329 वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित घरडा कंपनीशी संबंधित असून तब्बल 195 जणांचा समावेश आहे. 145 कोरोनाबाधित कामगाराचा समावेश असून त्यांच्या कुटुबातील 50 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील आतापर्यंत 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनी कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने नजीकचे ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत दुसऱ्य़ांदा घडला प्रकार : नातेवाईक आक्रमक, कोरोनाबाधित गर्भवती महिलेला नेताना विरोध, अखेर पोलिस यंत्रणा  आली धावून अन्.... -


घरडा कंपनीतील कोरोनाबाधितांची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. एकीकडे घरडा कंपनीतील कोरोना बाधिताची संख्या झपाट्याने वाढत असताना विनती कंपनीतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने कंपनी व्यवस्थापनासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या व चिपळूण येथे वास्तव्यास असलेल्या एका कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय धामणदेवी येथील एका रूग्णांचा समावेश आहे. दोन्ही कोरोनाबाधितांच्या कुटूंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याच्या हालचाली सुरू होत्या.

संपादन - अर्चना बनगे

loading image