एका रात्रीत मच्छीमार लखपती; जाळ्यात सापडली 'घोळ' मासळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका रात्रीत मच्छीमार लखपती; जाळ्यात सापडली 'घोळ' मासळी

रत्नागिरीतील दापोली येथील हर्णे बंदर मासेमारी लिलावासाठी प्रसिद्ध आहे.

एका रात्रीत मच्छीमार लखपती; जाळ्यात सापडली 'घोळ' मासळी

हर्णे : लिलावसाठी प्रसिध्द असलेल्या हर्णे बंदरात एका घोळ माशाचा लिलाव दोन लाख रुपयांना झाला असून सदरचा नौका मालक रातोरात लखपती झाला आहे. (harnai port) रत्नागिरीतील दापोली येथील हर्णे बंदर मासेमारी लिलावासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी बंदर पुन्हा एकदा घोळ माशाच्या लिलावामुळे चर्चेत आले आहे. (konkan update)

तब्बल दोन लाख रुपयांचा माशाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे बोट मालकाचे नशीबच फळफळले आहे. (Ghol fish found) मालक एकाच दिवसात लखपती झाला आहे. लिलावात एम.एम. फिशरीज कंपनीने दोन लाख रुपयांना हा मासा खरेदी केला आहे. या लिलाव बोट मालकाबरोबरच परिसरातील अनेक मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

समुद्रात दुर्मिळ असणारा हा मासा क्वचितच आढळून येतो. हा मासा सहसा मच्छीमारांच्या जाळ्यात सापडत नाही. परंतु ज्या जाळ्यात हा मासा सापडतो तो लखपतीच होतो. माशाची किंमत ऐकून बहुतांशी ग्रामस्थांत चर्चा सुरु आहे. हा मासा औषधी गुणधर्मासाठीही ओळखला जातो. त्याच्या शरीरामधला पाईप ऑपरेशनचा दोरा बनवण्यासाठी वापरतात. याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक असल्याने माशाला मार्केटमध्ये खूप किंमत असते.

यापूर्वीही असाच प्रकार पालघर जिल्ह्यातून समोर आला होता. येथील मच्छीमार चंद्रकांत तरे यांना मासेमारी करताना दीडशेहून अधिक घोळ जातीचे दुर्मिळ मासे सापडले होते. या माशांची बाजारात विक्री झाल्याने ते एका रात्रीत करोडपती बनले होते.

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विश्वजित कदमांची घुसखोरी?

Web Title: Ghol Fish Found In Harnai Port Ratnagiri Sale Of Rupees 2 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ghol Fish