esakal | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विश्वजित कदमांची घुसखोरी?
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विश्वजित कदमांची घुसखोरी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विश्वजित कदमांची घुसखोरी?

sakal_logo
By
दिलीप क्षीरसागर

कामेरी (सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसचे मंत्री विश्वजित कदम हे काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात दोन मंत्राचा सलोखा वाढणार की यातील संघर्ष वाढणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांनी नुकतीच शिराळा ,वाळवा तालुक्यात काँग्रेसची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून कार्यकर्ते रिचार्ज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस -शिवसेना यांचे सरकार आहे. प्रत्येक नेते पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष भक्कम करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर बाळासाहेब पाटील इस्लामपूरचे नगरसेवक वैभव पवार अशी मंडळी सध्या काँग्रेस पक्षाशी कार्यरत आहेत. यातील वैभव पवार यांनी भाजपचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांच्याशी सलगी वाढविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पक्षाला बळकटी येणार का? एकेकाळी हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.

स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांचे सहकारी व वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती भीमराव कृष्णा पाटील उर्फ छगन बापू (कामेरी) यांच्यावर दादाचा नितांत विश्वास होता. पंधरा वर्षांहून अधिक काळ छगनबापू वाळवा पंचायत समितीचे सभापती होते. रेठरे धरणाचे आर, एस, पाटील आप्पा, स्वरुपराव पाटील. एस वाय पाटील, यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली .त्यानंतर सी.बी पाटील, नानासाहेब महाडिक यांनी पक्षाचे नेतृत्व केले जयंतराव पाटील यांचे कट्ट्र विरोधक म्हणून ते ओळखले जात.मात्र त्यानंतर सी बी पाटील भाजपमध्ये गेले पण ते भाजपमध्ये रमले नाहीत. त्यानंतर नानासाहेब महाडिक यांचे निधन झाले.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: असे बनवा Vegan मोदक

नानासाहेब महाडिक व सी बी पाटील यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. युवा नेतृत्वात राहूल महाडीक, सम्राट महाडीक,व जयराज पाटील यांनी भाजप पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांनी ही राजकारणात मोठी आघाडी घेतली आहे. अशावेळी मंत्री विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे तालुक्याला खंबीर नेतृत्व कॉंग्रेसला कोण मिळणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

loading image
go to top