

Discovery of 50 Ancient Mancala Rock Boards Near Ghosalgad
sakal
पाली : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील घोसाळगडाच्या पायथ्याशी इतिहासाला उजाळा देणारा अत्यंत महत्त्वाचा पुरावा वन्यजीव अभ्यासक रोशन म्हात्रे व सह्याद्रीत गडकिल्ले भटकंती करणारे सुजल पडवळ यांनी शोधून काढला आहे. येथील खडकात कोरलेल्या गोलाकार खळग्यांच्या पद्धतशीर मांडणीतून हा खेळ मंकला (Mancala) प्रकारातील प्राचीन कातळ पटखेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.