esakal | दुर्दैवी, खेळता खेळता चिमुकली ट्रकखाली आली आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

The girl crushed under a truck in Nadhwade

परभणी येथील ऊसतोडणी कामगाराच्या चार वर्षीय बालिकेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. हा दुदैवी अपघात नाधवडे महादेवाचा माळ येथे आज दुपारी एकच्या सुमारास घडला. गायत्री त्रिंबक चिरमाडी असे मृत बालिकेचे नाव आहे. ट्रक चालक मारूती तुकाराम कातुरे (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुर्दैवी, खेळता खेळता चिमुकली ट्रकखाली आली आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग)  - परभणी येथील ऊसतोडणी कामगाराच्या चार वर्षीय बालिकेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. हा दुदैवी अपघात नाधवडे महादेवाचा माळ येथे आज दुपारी एकच्या सुमारास घडला. गायत्री त्रिंबक चिरमाडी, असे मृत बालिकेचे नाव आहे. ट्रक चालक मारूती तुकाराम कातुरे (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परभणी (ता. जिंतुर) ब्राम्हणगाव येथील ऊसतोडणी कामगार सध्या नाधवडे येथील केशव राबांडे यांच्या ऊसाची तोडणी करीत आहेत. कामगारांमध्ये त्रंबक गंगाराम चिरमाडी आणि त्यांची पत्नी देखील आहे. ऊसतोडणी सुरू असताना त्यांची चार वर्षाची मुलगी ट्रकमध्ये खेळत होती. एक ट्रक भरल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी जेवणासाठी सुट्टी घेतली. त्याचवेळी चिरमाडी दाम्पत्य देखील ट्रकमधील मुलीला घेवून झोपडीमध्ये गेले. याचवेळी मारूती तुकाराम कातुरे (रा. सोनाळी, कोल्हापूर) यांच्याकडील ट्रक (एम.एम.09, एल-8179) मळ्यातच एका कोपऱ्यात उभा होता.

कामगार घरी गेल्यामुळे ट्रकचालक कातुरे ट्रकमध्ये झोपले. याच कालावधीत आईवडिलांचे लक्ष नसताना गायत्री पुन्हा ट्रकखाली आली. थोड्यावेळाने ट्रक ऊसतोडणीच्या ठिकाणी नेताना ट्रक गायत्रीच्या अंगावरून गेला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ट्रकचालकाला देखील समजला नाही. ऊसतोडणी कामगार ट्रक भरण्यासाठी आले त्यावेळी काही कामगारांना एक मुल पडलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता ते बालक मृत असल्याचे स्पष्ट झाले. आपल्या बालिकेचा मृत्यू झाल्याचे समजताच चिरमाडी दाम्पत्याने टाहो फोडला. सहायक पोलिस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर, मारूती साखरे यांनी पंचनामा केला.

loading image