Sindhudurg News: चिरेखाणीतील शोकांतिका: अंघोळीला गेलेल्या पाच जणांपैकी एकीचा बळी, चौघांना दिले जीवनदान
girl drowning incident: कुंभारमाठ जवळील चिरेखाणीच्या पाण्यात अंघोळीला गेलेल्या १६ वर्षीय युवतीचा बुडून मृत्यू; राहुल भिसे या तरुणाने दाखवले धाडस, चार जणांना दिले जीवनदान.
कुंभारमाठगोवेकरवाडी: रस्त्यालगतच्या खाणीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडाल्याची घटना आज दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात करिश्मा सुनील पाटील (वय १६) हिचा बुडून मृत्यू झाला, तर चौघांना वाचविण्यात यश आले.