Loksabha 2019 : सुनील तटकरे यांनी जर तुमची सेवा केली असेल तरच मते द्या : अनिल तटकरे

पराग फुकणे 
रविवार, 14 एप्रिल 2019

रोहा : रोहेकर सुनील तटकरे यांना किती मताधिक्य देतात याकडे रायगडवासियांचे लक्ष आहे. एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून जर सुनील तटकरे यांनी जर तुमची सेवा केली असेल तरच मते द्या.'' , असे आवाहन आमदार अनिकेत तटकरे यांनी शनिवारी रात्री रोहा येथील काॅर्नर सभांमध्ये केले.

रोहा : ''राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय घेऊन कार्य अहवाल छापतात आणि असे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे रोह्यात नदी संवर्धनासाठी 80 कोटीचा निधी दिल्याचे सांगतात पण, त्यांचेच शिवसैनिक या कामाला विरोध करतात. हा निवडणूकीचा जुमला आहे. तो स्वीकारायची की नाही ते रोहेकरांनी ठरवावे. रोहेकर सुनील तटकरे यांना किती मताधिक्य देतात याकडे रायगडवासियांचे लक्ष आहे. एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून जर सुनील तटकरे यांनी जर तुमची सेवा केली असेल तरच मते द्या.'' , असे आवाहन आमदार अनिकेत तटकरे यांनी शनिवारी रात्री रोहा येथील काॅर्नर सभांमध्ये केले.

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ रोहा अष्टमीमध्ये आमदार अनिकेत तटकरे यांनी काॅर्नर सभा घेतल्या. त्यामध्ये अनिकेत तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, सभापती स्नेहा आंब्रे, समीर सकपाळ, नगरसेविका सौ पूर्वा मोहिते, शिल्पा धोत्रे, नगरसेवक महेंद्र गुजर, राजेंद्र जैन, अजित मोरे, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष अमित उकडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा दिपीका चिपळूणकर, शहर अध्यक्षा श्रद्धा पाटणकर, शहर काँग्रेस अध्यक्ष मितेष कल्याणी, अॅड सुनील सानप, शेकापचे संजय गांगल आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना'' सुनील तटकरे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असून तटकरे साहेबांच्या विजयाची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास व्यक्त करून सुनील तटकरे साहेबांनी उभ आयुष्य ज्यांच्या सोबत व्यतित केले त्या रोहेकरांनी त्यांना आशिर्वाद द्यावेत.  रोह्याचा कायापालट व  बदलांचे आपण साक्षीदार आहात. पाणीपुरवठा योजना, शहर सभागृह, ज्येष्ठ नागरिक सभागृह, महिला व्यायामशाळा, अशा अनेक योजनांसह गेल्या दोन वर्षांत सव्वाशे कोटींची कामे केली पण जाहिरातबाजीतून श्रेय घेण्याची सवय नसल्याने आम्ही मागे पडलो, त्यामुळे घरकी मुर्गी डाल बराबर अशी खंत अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केली.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही जाहिरातबाजीची कला अवगत असती तर,आम्हाला प्रचाराचीही गरज नव्हती असा टोला लगावला. कोकणात सुनील तटकरे यांचे नाव लोक आदराने घेतात. विद्यमान खासदारांनी रोहा शहरासाठी शून्य रूपयांचा निधी आणला. त्यामुळे सुनील तटकरे साहेबांवर बेंबीच्या देठापासून ओरडून आरोप कितीही केले तरी स्वतः किती निधी आणला हे सांगायची त्यांची हिंमत नाही. जात आणि धर्माच्या नावावर हे खासदार झाले पण विकासाच्या जोरावर खासदार होऊ शकले नाही व यापुढे ही होऊ शकणार नाहीत'' ,असा विश्वास अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.

''सहावेळा खासदार झालेल्यांची आता ओव्हर संपली आता सुनील तटकरे यांच्या रूपाने नवीन गोलंदाज येणार आहे.'' असा आशावाद अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.  सिनेअभिनेत्री समीरा गुजर यांनी ''सुनील तटकरे यांची निवडणूक म्हणजे माझ्या घरचे कार्य असून एक चांगला नेता सुराज्य निर्माण करू शकतो ती क्षमता, ते कर्तृत्व सुनील  तटकरेंनी त्यांच्या आत्तापर्यंत च्या राजकीय प्रवासात दाखवून दिले आहे. नामसाधर्म्यामुळे कोणीही उभे राहिले तरीही सुनील तटकरे नाम काफी है.'' ,असा विश्वास व्यक्त केला.उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर यांनी प्रास्ताविक केले तर सभापती समीर सकपाळ यांनी आभार मानले.

छत्रपती शिवाजी नगर येथील चौकात झालेल्या सभेला रोहेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी चंद्रकांत पार्टे, विजय वारंगे, दिलीप तलवार, ललित गुजर, गणेश महाकाळ, अविनाश शिंदे, यशवंत शिंदे, अशोक धोत्रे, रियाझ शेटे, सलील खातू, सुभाष राजे, मोहन साठे, मानसी दाते, अभिषेक पितळे, आदि उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give your opinion only if Sunil Tatkare has served you said Anil Tatkare