Mon, June 5, 2023

कणकवली : गोवा बनावटीच्या दारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on : 8 May 2022, 5:48 am
कणकवली : कणकवली शहरात गस्त घालत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मोटारीसह गोवा बनावटीची दारू असा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात सध्या होणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
त्याअनुषंगाने सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, कृष्णा केसरकर, रवी इंगळे पहाटे गस्त घालत होते. बिजलीनगर येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी महामार्गावरून जाणारी मोटार थांबविली. मोटारीची तपासणी केली असता सुमारे तीन लाख ७२ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी दारूसहीत मोटार ताब्यात घेतली.