
Goa Made Liquor Konkan : भाताच्या गोणी आड टेम्पोत ठेवलेली ५ लाख ४ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू वैभववाडी पोलिसांनी पकडली. पोलिसांनी ८ लाखांच्या टेम्पोसह १३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (ता. १२) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कुसूर पिंपळवाडी येथे करण्यात आली.