Goa Mystery Death : म्हापसा सामूहिक मृत्यू प्रकरणानं घेतलं नवं वळण! तिन्ही मृतदेहांच्या आतड्यांचा रंग बदलला; व्हिसेरा सुरक्षित, मृत्यूचं कारण अस्पष्टच...

Goa Mapusa family death mystery investigation : म्हापसा येथील जाधव कुटुंबातील तिघांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ कायम असून शवविच्छेदनानंतर व्हिसेरा तपासणी सुरू आहे.
Mapusa family death investigation

Mapusa family death investigation

esakal

Updated on

म्हापसा/सावंतवाडी : म्हापसा येथील इंदिरानगर-करासवाडा येथील एका भाड्याच्या खोलीत सोनुर्ली येथील जाधव कुटुंबातील बाप-लेकाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने (Goa family death mystery) परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी आणि गंभीर अवस्थेत असलेल्या सुवर्णा जाधव (वय ३०) यांचाही रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, त्यांच्याही आतड्यांचा रंग बदलल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com