ShivSena Protest: ‘गोकुळ’सह सहकार, लोकशाही वाचवा!; ठाकरे शिवसेना; तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्ती निर्णयाविरोधात कणकवलीत आंदोलन

Thackeray Sena Protest in Kankavli : गोकुळ दूध संघात चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे शिवसेनेने कणकवलीत आंदोलन केले. या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या मतदानाच्या अधिकाराचा अवमान होत असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला.
Thackeray Sena activists protest against the Gokul expert directors’ voting rights decision in Kankavli.

Thackeray Sena activists protest against the Gokul expert directors’ voting rights decision in Kankavli.

esakal

Updated on: 

कणकवली, : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे शिवसेना पक्षातर्फे आज कणकवलीत आंदोलन केले. ‘गोकुळ वाचवा, सहकार वाचवा, लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देत कणकवली येथील ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर काळे फलक हातात घेऊन सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.

Loading content, please wait...