esakal | Chiplun : गोंधळे जंगलात दुर्मिळ 'शॅमलियन'चं दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun : गोंधळे जंगलात दुर्मिळ 'शॅमलियन'चं दर्शन

Chiplun : गोंधळे जंगलात दुर्मिळ 'शॅमलियन'चं दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील गोंधळे (Gondhale Forest) येथील जंगलात अत्यंत दुर्मिळ असणारा शॅमलियन सरडा (Shamlian lizard)आढळून आला. याबाबत येथील तरुणांनी तात्काळ वर्ड फॉर नेचर संस्थेला कल्पना दिली. संस्था सदस्यांनी तात्काळ गोंधळे जंगलात धाव घेतली आणि सरड्याला सुरक्षितपणे नैसर्गिक जंगलात सोडले. (gondhale-forest- department-found-shamlian-lizard-ratnagiri-chiplun-akb84)

चिपळूण तालुक्यात अनेक मोठी जंगले असून त्यामध्ये विविध वन्यजीव व प्राणी आढळून येतात. काही वन्यप्रेमी निसर्गमित्र या ठिकाणी वनसंपत्ती व वन्यजीवांचे संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी येत असतात. यापूर्वी अनेक वेळा येथे दुर्मिळ जातीचे पक्षी, प्राणी आढळले आहेत. पण आता अत्यंत दुर्मिळ जातीचा व कोकणात न आढळणारा असा सरडा आढळून आल्याने पुन्हा एकदा चिपळूण तालुक्यातील जंगलाची चर्चा सुरू झाली आहे.

गोंधळे गावातील जंगल हे विस्तीर्ण आणि घनदाट आहे. काही तरुण येथे फेरफटका मारत असताना त्यांना एक आगळावेगळा सरडा निदर्शनास आला. हिरवा पोपटी रंग आणि त्याच्यावर सफेद ठिपके असा सुंदर सरडा बघितल्यानंतर हा दुर्मिळ जातीचा सरडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेशी संपर्क साधला असता, या संस्थेचे अमित जाधव, स्वप्नील जाधव, अविनाश जाधव आणि कार्याध्यक्ष प्रथमेश पवार यांनी थेट गोंधळे येथील जंगलात धाव घेऊन पाहणी केली असता, हा शॅमलीयन जातीचा अत्यंत दुर्मिळ असा हा सरडा असल्याचे त्यांच्या अभ्यासातून पुढे आले. तत्काळ त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

हेही वाचा: धोका कायम! सिंधुदुर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला

निसर्ग ऋतूप्रमाणे रंग बदलणारा गिरगिट

हा सरडा क्वचितच सापडतो. वातावरणाप्रमाणे आणि निसर्ग ऋतूप्रमाणे रंग बदलणारा गिरगिट म्हणून त्याची ओळख आहे. गोंधळे येथील जंगलात हा सरडा सापडल्याने येथील जंगल हे वन्यजीव आणि वन संपत्ती अभ्यासासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती वर्ल्ड फॉर नेचरचे कार्याध्यक्ष प्रथमेश पवार यांनी दिली आहे.Chiplun : गोंधळे जंगलात दुर्मिळ 'शॅमलियन'चं दर्शन

loading image