विधी आयुर्वेदाचा पॅटर्न ठरला कोरोनावर भारी ; दोघे झाले कोरोनामुक्त  

good impact on corona virus for Pattern of Ayurveda
good impact on corona virus for Pattern of Ayurveda
Updated on

चिपळूण - कोरोनावर लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगात प्रयत्न सुरू असताना  चिपळूणच्या डाॅ. अनुपमा अमोल कदम यांनी बनविलेल्या आयुर्वेदिक औषधांनी मुंबईतील दोघे कोरोनामुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटूंबीयांना क्वारंटाईन न करता त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचविले आगे. भस्म आणि जडी-बुटींचा वापर करून तयार केलेल्या या औषधांच्या पॅटर्नसाठी  अमेरिका, जर्मनसह मोठ्या देशातून मागणी होत आहे. 

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

तेरा वर्षापूर्वी अनुपमा कदम यांनी पती अमोल कदम यांच्या मदतीने दिड वर्ष कोकणातील जंगलात भटकंती करून येथील जडी-बुटींचा अभ्यास केला. मागील दहा वर्षापासून वेगवेगळ्या आजारांवर अभ्यास करून त्या ंमधुमेह, हृदयात होल असणे, सांधेवात, कॉलिस्ट्रॉल अशा 22 आजारांवर औषधे बनवत आहेत. केरळ मधील आयुर्वेेदिक शिक्षण संस्थेकडून त्या पदवी घेत आहेत. कोरोना व्हारस पसरल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार आणि तात्या सकपाळ यांनी कोरोनावर औषध तयार करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. डाॅ. अनुपमा कदम यांनी विधी आयुर्वेदच्या नावाने शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने औषध तयार केले. मुंबईतील हिंदमाता आणि कुर्ला येथील दोघांना त्यांनी कोरोनामुक्त केले. 

हिंदमाता भागात 250 स्के.फुटच्या खोलीत राहणार्‍या कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी रूग्णालय न मिळाल्यामुळे पाच दिवस तो घरीच होता. पत्नीसह अन्य पाच जण त्याची सेवा करत होते. नंतर पोतदार हॉस्पीटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. तात्या सकपाळ यांच्या प्रयत्नाने त्या रूग्णापर्यंत विधी आयुर्वेदची औषधे कुरिअरने पोहचवण्यात आली. डाॅ. कदम यांनी मोबाईलवरून औषध घेण्यासंबंधी मार्गदर्शन केले. दररोज उपाशीपोटी 40 मिलीचा एक डोस अशा पद्धतीने सात दिवस त्याने औषधे घेतली. त्याचबरोबर घरातील लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना क्वारंटाईन न करता वेगळी औषधे दिली. सात दिवसात तो रूग्ण कोरोनामुक्त झाला. त्याच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाला नाही. नंतर कुर्ला येथे राहणार्‍या त्याच्या सख्या भावालाही कोरोनाचा संसर्ग झाला त्यालाही डाॅ. कदम यांनी औषधे देवून कोरोनाबाधिताला कोरोनामुक्त केले.

नॉर्थ अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ रिसर्च सेंटरने औषधांच्या पॅटर्नसाठी अनुपमा कदम यांच्याशी करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर्मनीसह अन्य देशातूनही पॅटर्नसाठी मागणी आहे. मात्र अनुपमा कदम यांनी प्रथम देशासाठी औषध उपलब्ध करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com