
रत्नागिरी : मिर्या बंधार्याच्या सर्व्हेनंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारे सात स्पॉट निश्चित केले. त्याच्या दुरुस्तीचा सुमारे 98 लाखाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला. ‘निसर्ग‘ चक्रीवादळामुळे या धोकादायक स्पॉटना आणखी धोका निर्माण झाला आहे. दुरुस्तीसाठी आधीच वेळकाढूपणा झाला असताना आता शासनाच्या 33 टक्के कपातीच्या धोरणामुळे 98 लाखाच्या निधीलाही कात्री लागणार आहे. मंत्री उदय सामंत यानी याला दुजोरा दिला तसेच तातडीची दुरुस्तीही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
‘निसर्ग‘ चक्रीवादळामुळे मिर्या बंधार्याच्या या धोकादायक बाबी पुढे आल्या आहेत. पनन विभागाने हे धोके लक्षात घेऊनच या बंधार्याचा जानेवारी 2020 मध्ये सर्व्हे केला होता. यंदाच्या पावसात उधाणाच्या भरतीने बंधार्याची धूप होण्याच्या शक्यतेने तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे आदेश दिले होते. तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून देण्याचे आश्वास दिले होते.
त्यानुसार पनन विभागाने सर्व्हे करून पंधरामाड येथे 1, भाटीमिर्या 2, जाकीमिर्या 2 आणि अलावा 2 हे सात स्पॉट निश्चित केले. मिर्या येथील काही ग्रामस्थांनी दुरुस्तीबाबत मागणीही केली होती. परंतु प्रशासनाला काही जाग आली नाही. ‘निसर्ग‘ चक्रीवादळाच्या तडाख्यात पुन्हा मिर्या बंधारा ठिकठिकाणी वाहून त्याला भगदाड पडले आहे. पाणी मानवी वस्तीत शिरण्याची भीती आहे. प्रस्ताव देऊनही जिल्हा प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने मिर्यावासीयांचा जीव धोक्यात आहे.
‘दुष्काळात तेरावा महिना‘ या म्हणीप्रमाणे प्रस्तावाची गत झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे देश अडीच महिने लॉकडाऊनमध्ये आहे. आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यामुळे विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला शासनाने 33 टक्के कात्री लावली आहे. याचा फटका मिर्या बंधार्याच्या 98 लाखाच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला बसला आहे. या प्रस्तावातील अंदाजित रकमेलाही कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री उदय सामंत यांनी त्याला दुजोरा दिला. तसेच ‘निसर्ग‘ वादळामुळे वाहून गेलेल्या मिर्या बंधार्याची तातडीची दुरुस्तीदेखील हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.