अखेर तळीरामांच्या संयमाचा बांध फुटला ; दारू दुकानांवर तोबा गर्दी...

The government allow wine shops to open
The government allow wine shops to open

रत्नागिरी : शासनाने दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली आणि लॉकडाउनच्या काळात दारूच्या घोटासाठी सोशल मीडियावर गायावाया करणार्‍या तळिरामांच्या संयमांचा बांध आज फुटला. शासनाचे अधिकृत परवानगी दिल्याने शहर आणि परिसरातील ठिकठिकाणच्या दारू दुकांनापुढे तळीरामांनी आज ही गर्दी केली होती. अत्यंत सोशिक तळीरांमानी रांग लावताना मास्क आणि सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केल्याचे दिसत होते.


शासनाने आजपासून वॉईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. या परवानगीची तळिराम गेली दीड महिन वाट पहात होते. बंदीच्या काळात ब्लॅकचा धंदा तेजीत होता. अनेकांनी दुप्पट ते तिप्पट पैसे देऊन आपला ब्रँड खरेदी करून आपली तलप भागवत होते. मात्र या चढ्या दरांबाबत त्यांची कोणतीही आणि कोणाविरुद्धही तक्रार नाही, असा त्यांनी सामंजशपणा दाखवला. अनेक तळीरामांनी सोशल मीडियाव आपला व्हिडिओ करून पोस्ट केले होते की, दारूची दुकाने उघडी करा, आम्ही लॉकडाऊनच्या काळात दारू पिऊन घरातच बसू, बाहेर पडणार नाही, मात्र हात जोडून विनंती करतो की दारूची दुकाने सुरू करा, अशी कळकळीची विनंती तळिराम करीत होते.

देश आर्थिक अडचणीत आल्याने शासनाला महसुल मिळावा, या उद्देशाने अटी-शर्थी घालून आजपासून वॉईन शॉप उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे दीड महिने ज्याची आतुरतेने वाट पहात होते ती दारूची दुकाने उघडी होणार असल्याने आज तळीरामांच्या संयमाचा बांध फुटला आणि दारू दुकाने उघडी होण्यापूर्वीच दुकानांपुढे रांगा लागल्या आहेत. आज सकाळी दहा वाजता आठवडा बाजार येथील जोशीला वाईन शॉप बाहेर शेकडो तळिरामानी दारूसाठी रांगा लावल्या होत्या. मात्र यावेळी 3 फुटाचे अंतर सोडून नियमांचे पालन केल्याचे दिसून येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com