esakal | साहेब काही करा, पण आमच्या गावी सोडा... 
sakal

बोलून बातमी शोधा

village reach worker demand for government

कसबा बावड्यात अडीचशेवर बांधकाम मजूर अडकून; कर्नाटकातील गावी जाण्यासाठी धडपड 

साहेब काही करा, पण आमच्या गावी सोडा... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : कसबा बावडासह अन्यत्र ठिकाणी बांधकाम मजूर खूप आहेत. या मजुरांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. हे मजूर उत्तर कर्नाटकातील गावांतून आले आहेत. लॉकडाउनमुळे ते आता धास्तावले असून काही करा, आम्हाला आमच्या गावी सोडा..., असे ते सांगत आहेत. 

दीड महिना झाला. खायचे काय?,

कसबा बावडा परिसरात असे अडीचशेवर बांधकाम मजूर जिथे रिकाम्या जागा आहेत. तिथे आपली झोपडी, पाल उभा करून राहिले आहेत. पडेल ते काम करण्याची तयारी असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक या मजुरांना कर्नाटकातील अनेक गावातून बोलावून आणतात. यातून या मजुरांना रोजगार मिळतो. मात्र, कोरोनामुळे सर्व बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. दीड महिना झाला. खायचे कसे?, हा प्रश्‍न आहे. अनेक स्वयंसेवी संस्था काहीतरी त्यांना खाण्यासाठी आणून देत आहेत; पण असे किती दिवस चालायचे, हा प्रश्‍न ते करत आहेत.

हेही वाचा- हावीच्या विद्यार्थ्यांचा पोलिस, सैन्यदलाकडे कल

 ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही

जिल्ह्यात येण्यासाठी आणि जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. बरेच मजूर अशिक्षित आहेत. त्यामुळे शासकीय ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, हे त्यांना माहिती नाही. काहींनी भरलेतही. नागरी सेवा केंद्र बंद आहेत. व्हॉटस्‌ ऍप नंबरही दिले. त्या नंबरवर संपर्क साधा, गुगल फॉर्म भरा, असे सांगण्यात आले; पण या मजुरांनी काही करता आलेले नाही. आता महापालिकेने त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, तर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वांनी धीर धरावा, असे अधिकारी सांगत आहेत.