esakal | गोळप परिसरात एका सरकारी कर्मचाऱ्याला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Government Officer Corona Positive In Golap Region

गोळप परिसरात यापूर्वी चाकरमान्यांच्या माध्यमातून कोणताही विषाणू दाखल झाला नव्हता. परंतु रत्नागिरी शासकीय रुग्णालयाशी संबंधितांशी संसर्गाला सुरवात झाल्यानंतर गोळपमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली.

गोळप परिसरात एका सरकारी कर्मचाऱ्याला कोरोना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पावस ( रत्नागिरी) - रत्नागिरी तालुक्‍यातील गोळप परिसरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नव्याने सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. त्यात एका सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. 

गोळप परिसरात यापूर्वी चाकरमान्यांच्या माध्यमातून कोणताही विषाणू दाखल झाला नव्हता. परंतु रत्नागिरी शासकीय रुग्णालयाशी संबंधितांशी संसर्गाला सुरवात झाल्यानंतर गोळपमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे हा परिसर विषाणूबाधित क्षेत्र ठरविण्यात आला. आरोग्य विभागातर्फे आशा सेविकांच्या माध्यमातून तपासणी सुरू असताना चाकरमान्यांनाकडे विशेष लक्ष दिले जात होते.

लक्षणे न आढळल्यामुळे अनेकजण विलगीकरण कक्षातून आपला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर मोकळे झाले. परंतु आता स्थानिकांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे गंभीर बाब आहे. पावस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावांमध्ये रुग्णसंख्या 51 झाली असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील 36 लोक उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. 

कोरोनाने पावस परिसरात प्रवेश केल्यानंतर परजिल्ह्यातील आत्तापर्यंत 4 हजार 828 लोक दाखल झाले असून, त्यातील चौदा दिवसांचा कार्यकाल पूर्ण करून सुस्थितीत असलेले 4 हजार 90 लोक असून त्यातील 738 लोक 14 दिवसांच्या विलगीकरण कक्षात आहेत. आत्तापर्यंत या परिसरात 210 लोकांचा स्वॅब घेण्यात आला. यातील पूर्णगड, नाखरे, गावडे आंबेरे येथील पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

परिस्थिती जाणून घेता येत नाही 
या संदर्भात कुर्धे येथील अजय भिडे म्हणाले की, रुग्णांचे शासकीय रुग्णालयात रिपोर्ट तयार केले जातात. परंतु ते नातेवाइकांना पाहता येत नाहीत. त्यामुळे सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेता येत नाही. त्यांनी दिलेल्या व सांगितल्याप्रमाणे नातेवाइकांना ऐकून घ्यावे लागते. तसेच रुग्णांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावली जाते. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 

loading image