मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, निकषांत न बसणाऱ्या लाडक्या बहिणांना लाभ देणे बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले. त्यामुळे लाडक्या बहिणींची धावाधाव सुरू झालीये.
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीआधी घाईने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) लवकरच फेरसर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. ज्यांना या योजनेत अनुदान मिळाले आहे त्या सर्व लाभार्थी महिला निकषांत बसतात की नाही, हे या सर्वेक्षणात तपासले जाणार आहे. ज्या महिला निकषांत बसणार नाहीत त्यांना यातून वगळण्यात येणार आहे.