गोवेरी वाचनालयातर्फे गुणवंतांचा सन्मान

गोवेरी वाचनालयातर्फे गुणवंतांचा सन्मान

85341

गोवेरी वाचनालयातर्फे गुणवंतांचा सन्मान
वर्धापन दिन उत्साहातः विविध स्पर्धा, कार्यक्रमांना प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः सत्पुरुष कला, क्रीडा मंडळाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष व ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय गोवेरी वर्धापन दिन विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धांतील विजेत्यांसह गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदकिशोर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोवेरीचे सरपंच दशरथ परब, स्वरा गावडे, आनंदी गावडे, सतीश गावडे, प्रकाश गावडे आदी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचा अनुक्रमे निकाल असाः ५० मीटर धावणे मुलगे (लहान गट)-वरुण गावडे, चैतन्य गावडे, यश जाधव. मुली (लहान गट)-काव्या वारंग, तमन्ना वाळवे, गायत्री वारंग. १०० मीटर धावणेः मुलगे (लहान गट)-कृष्णा गावडे, सार्थक गावडे, दिव्येश जाधव. १०० मीटर धावणे ः मुली (मोठा गट)-पूर्वी गावडे, नागश्री गावडे, जान्हवी वारंग. बुद्धिबळ स्पर्धा ः चेतन भोगटे (विजेता), गौतम जाधव (उपविजेता). वन मिनिट शो स्पर्धा (लहान गट)-मैथिली गावडे, तीर्था वारंग, अर्चना गावडे. वैयक्तिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा (गाव मर्यादित लहान गट)-पूर्वी गावडे, तमन्ना वाळवे व वेदिका गावडे (विभागून), मनस्वी परब व रुणाली गावडे (विभागून). जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा-समर्थ गंवडी व दीक्षा नाईक, पूर्वा मेस्त्री व तन्मय आईर, नंदिनी बिले व निधी खडपकर. उत्तेजनार्थ वैष्णवी मुनणकर व दुर्वा पावसकर.
रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे परीक्षण रमाकांत जाधव व अंतरा रगजी यांनी केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा खुला गट-अर्चना गावडे व नैथिली गावडे, भाविक गावडे व सार्थक धुमक, हिमानी वाळवे व नागश्री गावडे. संगीत खुर्ची-तनिष्का नाईक, भाविक गावडे, तन्वी गावडे. स्मार्ट सुनबाई स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना प्रिया गावडे यांच्याकडून साड्या भेट देण्यात आल्या. विजेत्या अनिषा गावडे यांना संजय गावडे व उपविजेत्या सोनाली गावडे यांना पुरुषोत्तम गावडे यांच्यावतीने पैठणी देण्यात आली. स्मार्ट नवरोबा स्पर्धा-संदेश गावडे (विजेता), विकास गावडे (उपविजेता).
बक्षीस वितरण श्री देव सत्पुरुष मंदिरामध्ये करण्यात आले. यावेळी रोहन सामंत, राजू पट्टेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष संजय गावडे, देवस्थान मानकरी विठ्ठल गावडे व गोविंद गावडे, सत्पुरुष कला, क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान गावडे, संस्थापक सचिव मंगेश गावडे, माजी अध्यक्ष वामन गावडे, वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे, सचिव उमेश गावडे, गोवेरी पतसंस्था अध्यक्ष सुदाम गावडे आदींसह सत्यवान अरमरकर, कानू मुळीक, प्रसाद कुंटे, श्री. तेजम, बाबी राऊळ, अनिल गोसावी, गोवेरी ग्रामसेवक रघुनाथ भोगटे उपस्थित होते.
यावेळी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देवेंद्र परब यांना देण्यात आला. वाचनालयाकडून देण्यात येणारा आदर्श वाचक पुरस्कार शिवानी गावडे, आदर्श विद्यार्थी पुरस्कार समीक्षा गावडे (शाळा नेरुर-गोवेरी) व दिव्यांका पाटकर (शाळा नेरुर-गोवेरी भगतवाडी) यांना देण्यात आला. यानिमित्त साई कला मंच निर्मित दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. प्रास्ताविक वामन गावडे यांनी, सूत्रसंचालन महेश गावडे यांनी केले. आभार प्रकाश गावडे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com