
तालुक्यातील तोंडवली - बावशी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत.
कणकवली (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील तोंडवली-बापावशी आणि भिरवंडे ग्रामपंचायतीच्या दहा जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. यासाठी पाच केंद्रांवर 35 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उद्या हे कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील तोंडवली - बावशी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीच्या तीन केंद्रावर मतदान होणार आहे. तर भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी भिरवंडे येथे दोन केंद्रावर हे मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहाय्यक अधिकारी, शिपाई, अंगणवाडी सेविका असे आठ कर्मचारी असून सुरक्षितेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.
हेही वाचा - मातीत माती मिसळली की, मोती पिकवता येतात ; उंच माळरानावर पिकवली शेती
मतदान केंद्रावर ईएमव्हीमशीन द्वारे मतदान होणार असून प्रभाग निहाय उमेदवार एका मशीनद्वारे मतदान होणार आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटरवर कार्यकर्त्यांना पोलिंग बूथ लावता येणार आहे. मतदान केंद्रांसाठी दोन झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 यावेळेत होणार आहे. मतदान केंद्रावर आरोग्य पथक ही असेल. सर्वानी आचारसंहितेचे पालण करणे बंधनकारक आहे. उमदेवारांचा प्रचाराची सांगता झाली आहे. उद्या जाहीर प्रचार सभा घेता येणार नाही. केवळ मतदारांच्या भेटी घेता येणार आहे.
संपादन - स्नेहल कदम