'निवडणूक नको रे बाबा' ; सेनेसह भाजप, राष्ट्रवादीवर उमेदवार शोधण्याची वेळ

gram panchayat election opposition party to find out the right candidate for run election in ratnagiri
gram panchayat election opposition party to find out the right candidate for run election in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे गावपातळीवरील राजकारण तापायला सुरवात झाली आहे. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून असतात. मात्र, तालुक्‍यातील पावस ग्रामपंचायतीची राजकीय परिस्थिती अजब आहे. अनेकांनी निवडणूक नको रे बाबा, असे सूर आळवले आहेत.

शिवसेनेकडे एकहाती सत्ता आहे. स्थानिक पातळीवर कामं न होणे, एखादा वाद मिटवायचा तर समोरच्या दोन्ही पार्ट्या आपल्याच, त्यामुळे वाईटपणा कुणी घ्यायचा आणि तोही कोणाबरोबर. हे सर्व लक्षात घेत अनेकांनी निवडणुक नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सेनेसह भाजप, राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.

पावस ग्रामपंचायतीचे राजकारण काही वर्षापूर्वी फार वेगळे होते. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादीचे प्रस्थ कमी होत गेले. शिवसेनेने येथे मजबूत पक्षबांधणी केली. त्यामुळे पावस ग्रामपंचायतीवर एकहाती शिवसेनेची सत्ता आहे. भाजप किंवा राष्ट्रवादीला वाढण्यामध्ये सेनेने येथे काही ठेवलेले नाही. उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे पावस भागात अनेक विकास कामे करून पक्ष बांधला आहे. 

संधी नसल्याने लढण्यास इच्छुक नाहीत 

उमेदवार उभे करण्यासाठी पावस परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पावस ग्रामपंचायतीवरील भगवा कायम फडकत राहावा, यासाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांसह विभागप्रमुख, शाखाप्रमुखांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेचे पारडे जड असल्यामुळे भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पाय पसरण्यास संधी नसल्याने लढण्यास फारसे कोणी इच्छुक नाहीत.

तगडे उमेदवार देण्याचे आव्हान

या ग्रामपंचायतीत एकूण तेरा सदस्य आहेत. सर्वच्या सर्व सेनेचे आहेत. त्यामुळे सेनेच्या सदस्यांविरुद्ध तगडे उमेदवार देण्याचे आव्हान भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे. या परिसरात भाजपची ताकद होती; मात्र अंतर्गत दुफळीमुळे ती हळूहळू क्षीण झाली आहे. या निवडणुकीमध्येही तोच प्रत्यय येत आहे. हे दोन्ही पक्ष तगड्या उमेदवारांच्या शोधात आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com