
चिपळूण (रत्नागिरी) : एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत पातळीवर पक्षीय निवडणुका होत नाहीत. गट-तटात या निवडणुका अधिक ईर्षेने लढल्या जातात पण यावेळी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा खरा प्रश्न आहे. चिपळूणच्या आजी - माजी आमदारांनी ठरवले तर ग्रामीण भागात एकीचे चित्र येथे पहायला मिळेल.
तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे ठरवल्यास वेगळे चित्र पहायला मिळेल. कदाचित अनेक ग्रामपंचायती बिनविरोधही होऊ शकतात. पण त्यासाठी आजी - माजी आमदाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येकाला आपल्या गटाची सत्ता रहावी असे वाटत असल्याने महाविकास आघाडीची शक्यता कमी आहेच. दहा तारखेला मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम कधी लागेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मोबाईल दुरुस्ती होतीये चक्क हातगाड्यावर -
सरपंच जनतेतून निवडून येणार की सदस्यांमधून हेही काही महिन्याभरात स्पष्ट होईल. येत्या दहा तारखेला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे गावातील नेत्यांनी आतापासून उमेदवार व पॅनेलसाठी चाचपणी सुरू केली आहे. यानंतर सरपंच आरक्षण होऊन निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणुका लढण्याचे संकेत नेत्यांनी दिले असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत त्या पद्धतीचे पॅनेल स्थानिक पातळीवर होण्याची शक्यता कमी आहे.
डिसेंबरनंतर कधीही निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गावनिहाय मतदार यादीही तयार करण्यात आली आहे. सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यालाही साधारण महिन्याचा कालावधी जाईल. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणुकी लढवण्याची तयारी सुरू आहे.
एप्रिल ते डिसेंबरअखेर मुदत
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची प्राथमिक तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. कोरोनामुळे एप्रिलनंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. सर्व अनलॉक झाल्याने पुन्हा एकदा गावपातळीवरील राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने तापू लागले आहे. एप्रिल ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.