सरपंचपदाची रस्सीखेच ; नव्यांच्या आशा पल्लवीत, मोर्चेबांधणी सुरू 

gram panchayat sarpanch election 2021
gram panchayat sarpanch election 2021

राजापूर - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तो आता साऱ्यांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या सोमवारी (ता. 8) सहा, तर बुधवारी (ता. 10) 46 अशा 51 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे आता इच्छुकांकडून सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांपैकी कोणाचा पत्ता कापला जाणार आणि कोणाला संधी मिळणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका गत महिन्यात पार पडल्या. त्यानंतर, सरपंचपदाची आरक्षणही सोडत झाली. मात्र, निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नव्हता. आता हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये सोमवारी सहा तर, बुधवारी 46 अशा तालुक्‍यात दोन टप्प्यामध्ये सरपंचपदाच्या निवडणुका होणार आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीच्या दिवशी सकाळी 10 ते 12 वा. उमेदवारी अर्ज दाखल करणे, 12 वा. अर्ज छाननी आणि 2 वा. सरपंच निवडणूक असा कार्यक्रम राहणार आहे. 
सर्वच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातून, शह-काटशहाचे राजकारण होण्याची शक्‍यता आहे. 
 
सोमवारी निवडणुका या ग्रा.पं. मध्ये.. 
सोमवारी (ता. 8) सरपंचपदाच्या निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीत तळगाव, कोंडसरबुद्रुक, कारवली, पांगरे खुर्द, जवळेथर, तळवडे यांचा समावेश आहे. 
 
बुधवारी निवडणुका असणाऱ्या ग्रा.पं. 
बुधवारी सरपंच निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये शिळ, धोपेश्‍वर, गोवळ, उन्हाळे, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, कोदवली, ओणी, कोंडीवळे, मंदरूळ, चुनाकोळवण, पन्हळेतर्फे सौंदळ, मोसम, पांगरे बु., ससाळे, दोनिवडे, हरळ, रायपाटण, करक, येरडव, कार्जिडा, कोळंब, मिळंद, हातदे, मोरोशी, सौंदळ, ताम्हाणे, तुळसवडे, फुपेरे, परटवली, ओशिवळे, आडवली, आंबोळगड, सोलगाव, शिवणेखुर्द, वाडापेठ, कशेळी, कुंभवडे, पडवे, महाळुंगे, तारळ, वाल्ये, अणसुरे, कुवेशी, दळे, निवेली यांचा समावेश आहे. 

हे पण वाचा पहिल्या निवडणुकीतच अवघ्या २२ व्या वर्षी ग्रामपंचायत अध्यक्ष होण्याचा रोहनने मिळवला मान 
 
अनेकांचे पत्ते कट.. 
सार्वत्रिक निवडणुका झालेल्या 51 ग्रामपंचायतींपैकी तब्बल चाळीस ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्वाचा दावा केला आहे. त्यानंतर, भाजप, कॉंग्रेससह मनसेनेही वर्चस्वाचा दावा केला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाने सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे पत्ते कापले गेले. त्यामुळे काही सदस्याना सरपंच बनण्याचे वेध लागले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com