पहिल्या निवडणुकीतच अवघ्या २२ व्या वर्षी ग्रामपंचायत अध्यक्ष होण्याचा रोहनने मिळवला मान

22 year old rohan bhivesh the chairman of grampanyat in jatrat nipani
22 year old rohan bhivesh the chairman of grampanyat in jatrat nipani
Updated on

जत्राट (बेळगाव) : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीने झाल्या. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पद मिळविण्यासाठी आरक्षण असूनही बऱ्याच ठिकाणी निवडणुका लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र निपाणी तालुक्यातील जत्राट ग्रामपंचातीत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. येथील रोहन रमेश भिवशे यांनी पहिल्या निवडणुकीतच अवघ्या 22 वर्षी अध्यक्षपदाचा मान मिळावला आहे.

कर्नाटक राज्यात कमी वयात ही एकमेव निवड झाली आहे. विशेष म्हणजे भिवशे घराण्यातील आता रोहन भिवशे हे तिसऱ्या पिढीतील सदस्य अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदी लता कल्लोळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. येथील दिवंगत नारायण भिवशे यांच्यापासून भिवशे यांच्या घराण्यात राजकारणासह समाजकारणाची परंपरा कायम आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवशे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पूत्र रोहन भिवशे हे ग्रामपंचायत निवडणुकीत उतरून पहिल्याच फेरीत मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. 

बुधवारी (ता. 3) झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. सध्याची भिवशे यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवशे यांच्या कार्यकाळात जत्राट ग्रामपंचायतीला गांधी ग्राम पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी गावात विविध समस्या निकालात काढल्या आहेत. त्याची फलश्रृती म्हणूनच नागरिकांनी बिनविरोध तिसऱ्या पिढीला अध्यक्षपदाचा मान दिला आहे. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

निवडणूक अधिकारी म्हणून जलसंपदा विभागाचे जी. डी. मंकाळे यांनी तर सहाय्यक अधिकारी म्हणून ग्रामविकासाधिकारी डी. बी. बाचणकर, विजय नगरे यांनी काम पाहिले. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवशे, शिवाजी रानमाळे, रमेश कांबळे, संजय करनुरे, शरावती कोळी, रहिमा फकीर, गंगुबाई नाईक, राणी कांबळे, विजय पोवार, बनाबाई हंडोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

"आमच्या घराण्याला तिसऱ्या पिढीपासून राजकीय वारसा लाभला आहे. वडिलांच्या मार्गदर्शनानुसार गावात रखडलेली विविध विकासकामे पूर्ण करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहोत."

- रोहन भिवशे, नूतन ग्रा. पं. अध्यक्ष, जत्राट

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com