शिवसेनेची सत्ता असल्यानेच अपक्ष म्हणून रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्‌द्‌यावरून राजकारण आणि समाजकारण तापले आहे.

राजापूर (रत्नागिरी) : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर जोरदार घमासान आणि गोंधळ सुरू आहे. त्याचे पडसाद आता तालुक्‍यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही उमटणार आहेत.

सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नाणार परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये प्रकल्प समर्थक अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी दिली. यामध्ये कुंभवडे, तारळ, अणसुरे आदी ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.    

हेही वाचा -  गुंतवणुकीच्या अमिषाने भामट्यांनी घातला पावणेदोन कोटींचा गंडा -

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या तालुक्‍यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.  या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली आहे. तालुक्‍यामध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्‌द्‌यावरून राजकारण आणि समाजकारण तापले आहे. त्याचे पडसाद आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही उमटू लागले आहेत.

तालुक्‍यात होत असलेल्या ५१ ग्रामपंचायतींमध्ये रिफायनरी प्रकल्पग्रस्त गावांमधीलही काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणारे विविधांगी ठराव ग्रामपंचायतींमार्फत दिले जातात. त्यामध्ये ग्रामपंचायतींची भूमिका महत्वाची ठरते. त्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने प्रकल्प समर्थक आणि प्रकल्प विरोधक यांच्यामध्ये अहमिका 
लागली आहे. 

हेही वाचा - ‘तू माझ्याशी चॅटिंग केले आहेस, थांब तुझी दिल्लीत तक्रार करतो म्हणत घातला सव्वातीन लाखांना गंडा -

शिवसेनेची सत्ता असल्यानेच रिंगणात

नाणार परिसरातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे राजकीयदृष्ट्या वर्चस्व आहे. हे वर्चस्व नाणार रिफायनरी प्रकल्पासंबंधी घेण्याबाबतच्या शिवसेनेच्या निर्णयात महत्वाची भूमिका ठरत आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांनी या भागात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आंबेरकर यांनी पुष्टी जोडताना प्रकल्प समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grampanyat election run by a narnara village people individually this year in ratnagiri