esakal | सावधान : कोकणात माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकाला बसलाय दणका
sakal

बोलून बातमी शोधा

gramsevak fine of Rs 25000 vaibhavwadi case kokan marathi news

कुसुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांना राज्य माहिती आयुक्तांनी वेळेत माहीती न दिल्यामुळे सुनावणी अंती 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

सावधान : कोकणात माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकाला बसलाय दणका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : कुसुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांना राज्य माहिती आयुक्तांनी वेळेत माहीती न दिल्यामुळे सुनावणी अंती 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. ग्रामस्थ राजेंद्र विश्राम पाटील यांनी हे अपिल केले होते. हा दंड त्यांच्या पगारातून तीन टप्प्यात वसुल करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. 

पाटील यांच्या वडिलोपार्जीत घराचा वाद गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या अनुषंगाने  पाटील 10 सप्टेंबर 2018 ला ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेल्या 304, 306, 307 या घरांची घरपट्टी केव्हापर्यंत भरली आहे, अशी माहिती कुसुर ग्रामपंचायतीचे जनमाहीती अधिकारी तथा ग्रामसेवक यांच्याकडे मागीतली होती. याशिवाय त्यांनी त्या अनुषंगाने विविध माहिती मागीतली होती. दरम्यान पाटील यांनी मागितलेली काही माहिती त्यांना माहिती अधिकारी असलेल्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेली नाही. त्यामुळे पाटील यांनी त्यासंदर्भात राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल केले होते. 

या प्रकरणाची सुनावणी राज्य माहिती आयुक्तांसमोर झाली. या सुनावणीवेळी कुसुर ग्रामपंचायतीच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण राज्य माहिती आयुक्तांनी अमान्य केले. अपिलार्थी  पाटील यांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याबद्दल ग्रामसेवकांना 25 हजार रूपयेचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम त्यांच्या पगारातून तीन टप्प्यात वसुल करण्याचे निर्देश जिल्हा परिषद लेखाविभागाला दिले आहेत. 

हेही वाचा- नीलेश राणे यांची अजित पवारांवर टीका; प्रसंगी बारामतीत जाऊन प्रत्युत्तर

दोन दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार, 15 व्या वित्त आयोगाचे आराखडे तयार करण्याचे काम, फेरआकारणी, ऑनलाईन काम, भात नुकसानीचे पंचनामे आणि दैनंदिन काम यासह विविध कामे सुरू असताना ही माहिती मागवली होती. त्यामुळे ती वेळेत देता आलेली नाही. माहिती वेळेत दिली नाही म्हणून राज्य माहिती आयुक्तांकडून दंड आकारला आहे हे वास्तव आहे. त्यासंदर्भात काय करता येईल? याचा विचार सुरू आहे. '' 
- जी. एस. नावळे, ग्रामसेवक तथा जनमाहिती अधिकारी, ग्रामपंचायत कुसुर 

माहिती वेळेत न देणे, अपुरी माहिती देणे असे प्रकार सातत्याने ग्रामपंचायतीकडून सुरू आहेत. त्याबाबत मी राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केले होते. एका अपिलाचा निकाल लागला असून अजूनही 23 अपीलांवर निकाल होणे बाकी आहेत. पहिला निकाल माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. '' 
- राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, कुसुर  

संपादन- अर्चना बनगे

loading image