esakal | तौक्ते चक्रीवादळात कळंबटे आजोबा ठरले हिरो, जीव धोक्यात घालून वाचवला नातवाचा प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

तौक्ते चक्रीवादळात कळंबटे आजोबा ठरले हिरो, जीव धोक्यात घालून वाचवला नातवाचा प्राण

तौक्ते चक्रीवादळात कळंबटे आजोबा ठरले हिरो, जीव धोक्यात घालून वाचवला नातवाचा प्राण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम (tauktae cyclone) कोकण किनारपट्टीवर (kokan) चांगलाच जाणवला. या वादळातील अंगावर शहारे आणणारा प्रसंग आंबेशेतमधील अशोक कळंबटे कुटूंबीयांनी अनुभवला. याच संकटातून आजोबांनी आपल्या नातवाला सुखरुप बाहेर काढले. रत्नागिरीतील (ratnagiri) आंबेशेत गावातील अशोक कळंबटे यांचे वय साधारण पन्नाशीच्या घरात. मात्र त्यांनी तौत्के चक्रीवादळाच्या संकटाचा सामना धीराने केला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस (heavy rain) यात आजोबांच्या घरावर पुराणवृक्ष कोसळला. दोन भलीमोठी झाडं त्यांच्या घरावर कोसळली. झाड कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर आजोबांनी आपल्या नातवाला काही होणार नाही याची खबरदारी घेतली. या दुर्घेटनेत आपल्या जिवाचा कोट करून आजोबांनी आपल्या नातवाला सुखरुप बाहेर काढले. (grandfather save life grandson in ratnagiri tauktae cyclone)

पाच वर्षाचा नातू वेदांत आपले आजोबा अशोक कळंबटे यांच्यासोबत होता. घरावर झाड पडत असताना या घरात अशोक यांची पत्नी सुगंधा त्यांचा मुलगा भालचंद्र आणि भालचंद्र यांची पत्नी रुणाली होती. सोसाट्याच्या वार्‍यामुळे घरावर झाड कोसळण्याची भिती असलेल्या अशोक यांनी झाड तुटल्याचा भला मोठा आवाज आला. त्याचवेळी समोरून नातू वेदांत दुसर्‍या रुममध्ये जात होता. झाड पडल्याची कल्पना आलेल्या अशोक यांनी आपला नातू झाड पडत असलेल्या दिशेने जात असल्याचं लक्षात आले. काही क्षणात अशोक यांनी आपल्या नातवाला धरले. त्याच्या अंगावर स्वतः झोपले आणि या नैसर्गित आपत्तीत नातवाला काही होणार नाही याची खबरदारी घेत आपल्या जिवाची पर्वा न करता नातवाचा जीव वाचवला.

हेही वाचा: रत्नागिरीत बांधकाम साहित्याची दुकाने 8 दिवस सुरू; उदय सामंत

या धावपळीत त्यांच्या पत्नीच्या डोक्याला पत्रा लागल्याने दुखापत झाली. तौत्के वादळ पाच वर्षाच्या वेदांत कळंबटे यानं अनुभवलं. वादळ आलं तेव्हा वेदांत देवघरात होता. भलं मोठ झाड कोसळलं आणि वेदांत आजोबांच्या दिशेने पळत गेला. वेदांतला आजोबांनी सुखरुप बाहेर काढलं. आपल्या नातवाच्या अंगावर येणारं संकट स्वतः आजोबांनी झेललं. यात त्यांच्या पाठीला दुखापत झाली. वादळाच्या या संकटात आजोबा नातवापुढे एका सावलीसारखे उभे राहीले. आजोबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या नातवाला वाचवले, पण कुटुंबाची ढाल बनूनही कळबंटे आजोबा पुढे आले.