मासळी निर्यातीस रत्नागिरीत मोठी संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

रत्नागिरी - फ्रोझन कोळंबी (वनामी व ब्लॅक टायगर कोळंबी), फ्रोजन फिश, सुरमई, प्रक्रियायुक्त कोळंबीच्या निर्यातीला मोठी संधी उपलब्ध आहे. या सर्व मासळीची अमेरिका, आग्नेय आशिया, जपान, युरोप महासंघामध्ये निर्यात होते. तेथे याची मोठी बाजारपेठ आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मच्छीमारांनी या निर्यातीकडे वळल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, असे ‘एमपेडा’चे अधिकारी टी. आर. गिबिनकुमार यांनी सांगितले.

रत्नागिरी - फ्रोझन कोळंबी (वनामी व ब्लॅक टायगर कोळंबी), फ्रोजन फिश, सुरमई, प्रक्रियायुक्त कोळंबीच्या निर्यातीला मोठी संधी उपलब्ध आहे. या सर्व मासळीची अमेरिका, आग्नेय आशिया, जपान, युरोप महासंघामध्ये निर्यात होते. तेथे याची मोठी बाजारपेठ आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मच्छीमारांनी या निर्यातीकडे वळल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, असे ‘एमपेडा’चे अधिकारी टी. आर. गिबिनकुमार यांनी सांगितले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर व लायन्स क्‍लबतर्फे निर्यातीसंदर्भात एक दिवसीय चर्चासत्रात त्यांनी मासळी निर्यातीसंदर्भात परिपूर्ण माहिती दिली. लोकांपर्यंत योजना पोचवायच्या आहेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीऐवजी पूर्व किनारपट्टीवर मच्छीविषयक नवे प्रकल्प बऱ्याच प्रमाणात कार्यान्वित होणार आहेत. पॅथॉलॉजी लॅब, ग्रंथालय, सीबास व मड क्रॅब डेमो फार्म, फिनफिश डेमो फार्म आदी प्रकारचे हे प्रकल्प आहेत. चेन्नई, अंदमान, कारिकल, विजयवाडा, पोझियूर, सिरकली, महेंद्रपल्ली, तुतीकोरिन, कन्याकुमारी येथे प्रकल्प होणार आहेत.

महाराष्ट्रात १३९ मासळी निर्यातदारांची नोंदणी आहे, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जणांची नोंदणी आहे. सरासरी १४१४ मेट्रिक टन निर्यातीची त्यांची क्षमता आहे. युरोपियन युनियन ग्रेडचे ४ प्रकल्प असून त्यांची क्षमता ६९८ टन आहे. मच्छी निर्यातीसाठी समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे (एमपेडा) उपविभागीय कार्यालय माळनाका रत्नागिरी येथे जून २०१८ मध्ये नव्याने सुरू केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरसाठी हे 
कार्यालय काम करते.

मिरकरवाडा बंदरात अनेक समस्या
मिरकरवाडा बंदरामध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बंदरात काही समस्या जाणवतात. ओहोटीच्या वेळेस बोटी आत आणताना गाळाची मोठी समस्या आहे. जाळी बांधणी व दुरुस्ती केंद्राचा अभाव, पॅकिंग व लिलावासाठी जागा नाही. तत्कालीन इंधन भरण्यासाठीचे पंप बंद आहेत. सांडपाणी प्रक्रिया न करता थेट बंदरात पाणी सोडले जाते. जेट्टीवर फिरते विक्रेते, दुकानदार, मच्छी विक्री आदींनी व्यापले आहे.

मासळीविषयक प्रदर्शनाचे आयोजन
ॲक्वा ॲक्वेरिया इंडिया २०१९ या मासळीविषयक प्रदर्शनाचे आयोजन हैदराबाद येथे ३० ऑगस्ट व १ सप्टेंबरला केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ॲक्वा ॲक्वेरिया डॉट कॉम या वेबसाईटवर किंवा एमपेडा, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 

महाराष्ट्रातून होणाऱ्या निर्यातीची आकडेवारी
प्रकार      टन       यूएस डॉलर मिलियन
फ्रोझन कोळंबी     ५३०६३      ४१०.५३
फ्रोझन फिश        ३९७७०        ८९.१०
फ्रोझन क्‍यूटर फिश      ३३२५       १४.४२
ड्राय ॲटम      ३८१५      २३.८७
लाईव्ह ॲटम      १०     ०.४०
चिल्ल ॲटम     १९२५      ११.२९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great opportunity for jewelery exports in Ratnagiri